R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या ठाण्यात बदलींनंतर कर्मचाऱ्यांना तोच विभाग,तेच काम

ठाण्यात बदलींनंतर कर्मचाऱ्यांना तोच विभाग,तेच काम

ठाणे | महापालिका आयुक्तांनी पालिकेतील १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून केल्या होत्या. परंतु बदलीनंतरही ते आधी ज्या विभागात कार्यरत होते, तेच विभाग त्यांना देण्यात आल्याचा आरोप नगरसेवकांनी महासभेत केला. याप्रकरणी संबंधित सहायक आयुक्तांच्या चौकशा करून दोषींवर कारवाई करण्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

दोन महिन्यापूर्वी महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी अनाधिकृत बांधकामांच्या मुद्यावरुन सर्वच प्रभाग समितीमधील १७० कर्मचाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. या बदल्या करतांना अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना इतर विभागाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. परंतु असे असतांनाही गुरुवारी झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी काही गंभीर बाबी पुढे आणल्या आहेत. कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या असल्या तरी ज्या कर्मचाऱ्यांकडे आधी अतिक्रमणाचा कार्यभार होता, त्यांना इतर विभागाचा कार्यभार देणे गरजेचे होते. परंतु बदलीनंतर नवीन ठिकाणी देखील त्यांना तोच कार्यभार कसा देण्यात आला असा सवाल नजीब मुल्ला यांनी उपस्थित केला.

या नवीन पदभारांना सहाय्यक आयुक्तच जबाबदार असल्याचा आरोप मिलिंद पाटणकर यांनी केला. आयुक्तांच्या बदल्यांच्या निर्णयाला एकप्रकारे केराची टोपली दाखवली असल्याचा आरोप महापौर नरेश म्हस्के यांनी केला. ज्या ठिकाणी असे प्रकार घडले असतील त्या ठिकाणांच्या सहाय्यक आयुक्तावर कारवाई करण्याची मागणी देखील यावेळी करण्यात आली. बदली नंतरही असे प्रकार घडले असतील तर सहाय्यक आयुक्तांनी प्रशासनाला अंधारात ठेवले असाच त्याचा अर्थ होतो, असे मत यावेळी अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे यांनी व्यक्त केले. त्यामुळे ज्या ज्या प्रभाग समितीच्या ठिकाणी असे प्रकार झाले असतील त्याठिकाणच्या सहाय्यक आयुक्तांवर चौकशी करुन योग्य ती कारवाई केली जाईल असेही श्री.हेरवाडे यांनी स्पष्ट केले.

 

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments