R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आणखीन दोन महिने लांबणीवर

स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका आणखीन दोन महिने लांबणीवर

 

ठाणे : ठाणे महापालिकेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन महिने पुढे जाण्याची शक्यता असून इच्छुक उमेदवारांच्या खर्चात वाढ होणार आहे तर दुसरीकडे ठामपाच्या प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. महापालिकेच्या नगरसेवक पदाची मुदत फेब्रुवारी महिन्यात संपणार आहे. राज्यातील महापालिकांची निवडणूक फेब्रुवारी २२ ते २२ मेपर्यंत होणे अपेक्षित आहे. त्याकरिता तीन सदस्य प्रभाग पध्दतीने प्रभाग रचना तयार केली जाणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने ३० नोव्हेंबर २१पर्यंत कच्चा आराखडा तयार करून पाठविण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार विविध महापालिकांना मुदत देण्यात आली आहे. कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि वसई-विरार महापालिकेच्या प्रशासनाने कच्चा आराखडा तयार करून निवडणूक आयोगाकडे पाठवला आहे.

या तीन महापालिकांची मुदत दीड वर्षांपूर्वी संपली असून सध्या कारभार प्रशासकाच्या हातात आहे, त्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका लवकर होण्याची शक्यता आहे. ठाणे, पिंपरी-चिंचवड, औरंगाबाद, मुंबई, उल्हासनगर आणि पुणे या महापालिकांची निवडणुका २० फेब्रुवारी २०१७ साली झाली होती त्यामुळेच यावेळी देखील या निवडणुका एकाच वेळी होतील.

राज्य सरकारने मुंबई महापालिकेच्या नगरसेवकांची संख्या नऊने वाढवली आहे, त्यामुळे प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा पुन्हा करावा लागणार आहे. त्याकरिता वेळ जाणार आहे. मुबई महापालिकेच्या नगरसेवक वाढीचा अध्यादेश अजूनही निघाला नाही, त्यामुळे प्रभाग रचना करण्यास वेळ लागणार आहे. कोरोनाचे कहर कमी झाला असला तरी अजूनही तिसरी लाट येण्याची शक्यता तज्ञ व्यक्त करत आहेत.

निवडणुकीतील ओबीसींच्या आरक्षणाचा प्रश्न अजूनही प्रलंबित आहे, त्यामुळे ही निवडणूक एप्रिल किँवा मे महिन्यात घेतली जाण्याची शक्यता महापालिकेतील एका वरीष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे. या निवडणुकीकरिता इतर महापालिकांचा कर्मचारी वर्ग मागवला जातो. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांची ज्यादा कुमुक मागवावी लागते, त्यामुळे एकाच वेळी राज्यातील २१ महापालिकांच्या निवडणुका घेणे निवडणूक आयोगाला शक्य नाही. त्यामुळेच टप्प्याटप्प्याने निवडणुका होण्याच्या शक्यता ‘त्या’ अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

निवडणुका वेळेवर होणार की पुढे जाणार, याबाबत इच्छुक उमेदवारांमध्ये धाकधूक सुरू आहे. निवडणूक पुढे गेली तर खर्च वाढण्याची भीती इच्छुकांनी व्यक्त केली आहे. जेवढी निवडणूक पुढे जाईल तेवढा खर्च वाढतो. मतदारांच्या अपेक्षा पूर्ण कराव्या लागतात, त्यामुळे निवडणूक वेळेवर होणे कधीही चांगले असते, असे एका नगरसेवकाने सांगितले. निवडणूक वेळेवर घेणे, त्याचा कार्यक्रम जाहीर करण्याचे अधिकार राज्य निवडणूक आयोगाचे आहेत. त्यामुळे निवडणुकीच्या तारखा तेच जाहीर करतील, असे देखील तो अधिकारी म्हणाला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments