R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश बीएसयुपी घरकुल योजनेतील घरांचे वाटप, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

बीएसयुपी घरकुल योजनेतील घरांचे वाटप, खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांच्या पाठपुराव्याला यश

 

ठाणे | कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने राबवलेल्या बीएसयूपी योजनेअंतर्गत ७ हजार २७२ घरे बांधण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले होते. त्यातील १ हजार ९९५ पात्र लाभार्थ्यांना या घरांचे वाटप करण्यात आले आहे. मात्र प्रत्यक्षात ४ हजार ५०० घरे बांधून पूर्ण झाल्याने ही घरे रस्ते आणि इतर प्रकल्पांतील बाधितांना विनामूल्य देण्याची आग्रही मागणी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी केली होती.

मात्र हा प्रकल्प केंद्र आणि राज्य सरकार मिळून करत असल्याने ही घरे बाधितांना देण्यापूर्वी राज्य सरकारची परवानगी गरजेची होती. याबाबत ज्यांची घरे रस्ते अथवा विकासकामांसाठी तोडली गेली असतील अशा पात्र लाभार्थ्यांना पर्यायी घरे देणे शासनाची जबाबदारी असल्याने उपलब्ध घरे लोकांना तात्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश कल्याण डोंबिवलीच्या आयुक्तांना दिले आहेत. त्यामुळे बीएसयुपीमधील घरे या प्रकल्पबाधितांना उपलब्ध करून देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

यावेळी खासदार डॉ.श्रीकांत शिंदे, कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यवंशी,कल्याण जिल्हाप्रमुख गोपाळ लांडगे, शहरप्रमुख राजेश मोरे, नगरसेवक दिपेश म्हात्रे आदी मान्यवर उपस्थित होते.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments