R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या शरद पवारांचे गेल्या ४० वर्षांपासून एसटी कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध'

शरद पवारांचे गेल्या ४० वर्षांपासून एसटी कामगारांशी जिव्हाळ्याचे संबंध’

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण व्हावे या मागणीसाठी एसटी कर्मचारी मागच्या दोन आठवडयासपून आंदोलन करत सून या आंदोलनात आता सत्ताधारी आणि वोर्धकांमध्ये जोरदार युद्धच सुरु झाले आहे. त्यातच या आंदोलनावर तोडगा कडण्यासाठी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन मंत्री अनिल परब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक झाल्याचे वृत्त सुद्धा समोर येत आहे. यावर आता राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री डॉ जितेंद्र आव्हाड यांनी भाष्य केले आहे,

गेल्या ४० वर्षांपासून एस. टी. कामगारांच्या समस्या आणि एस.टी. कामगारांशी शरदचंद्र पवार यांचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत. त्यामुळे त्यांच्या घरी किंवा त्यांच्या समवेत बैठक झाल्यास त्यात वावगे काय?, असा प्रश्नही आव्हाड यांनी विचारला. तसेच, ऊसतोड कामगारांच्या बैठकीचा अंतिम मसुदा देखील पवारांच्या उपस्थितीत कै. गोपीनाथ मुंडे मंजूर करून घ्यायचे.

स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांना ऊसतोड कामगारांबद्दल प्रचंड सहानुभूती होती आणि शरदचंद्र पवार यांनीही ऊसतोड कामगारांची जबाबदारी स्वीकारली होती. नेत्यांनी अत्यंत जबाबदारीने श्रमिकांचा विचार केला पाहिजे. त्यांचे शोषण थांबवल पाहिजे. जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष त्यांच्या शोषणाला, त्यांना उद्ध्वस्त करायला कारणीभूत ठरतात; त्यांना खड्यासारख बाहेर ठेवलं पाहिजे, तेच काम शरद पवार करतील, अशी अपेक्षाही आव्हाड यांनी व्यक्त केली आहे.

या झालेल्या बैठीवर परिवहन मंत्री अनिल परब म्हणाले की, ‘आजच्या बैठकीत वेतन वाढीसंदर्भातही चर्चा झाली, येत्या हिवाळी अधिवेशनात त्यावर चर्चा होईलच. त्यानंतर बिझनेस अँडव्हायजरी कमिटीसमोर या विषयावर चर्चा होईल. आम्हाला जी माहिती शरद पवारांना द्यायीच होती, ती आम्ही त्यांना दिली. कामगारांचे दुसरे प्रश्न काय आहेत? त्यांच्या वेतन वाढीचा विषय आहे. बाकीच्या राज्यात कशा पद्धतीने परिवहन चालतं, त्यांचे पगार काय आहेत? या सगळ्यांवरही चर्चा आज केली. राहिला विषय एसटीच्या विलीनीकरणाचा, तर तो मुद्दा हायकोर्टाच्या समितीसमोर आहे. कोर्ट देईल तो निर्णय स्वीकारणार,’ अशीही माहिती परब यांनी दिली.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments