R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश जळगाव जिल्हा बँकेत भाजपचा दणाणून पराभव !

जळगाव जिल्हा बँकेत भाजपचा दणाणून पराभव !

 

जळगाव | जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत गेल्यावेळी भाजपचे तत्कालीन नेते आणि माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या वर्चस्वामुळे सत्ता काबीज केली होती. मात्र यंदा राज्यात महाआघाडीचे सरकार आणि त्यात जिल्ह्यातील भाजपचे नेते एकनाथराव खडसे हे देखील राष्ट्रवादीत आहेत. मुळात राज्यातील सहकार क्षेत्र हे भाजपच्या बसची बात नाही हे आजच्या निकालाने पुन्हा सिद्ध झाले आहे.

तत्कालीन फडणवीस सरकारमध्ये माजी मंत्री गिरीश महाजन यांचा चांगलाच दबदबा होता. संकटमोचक म्हणून त्यांनी सर्वच ठिकाणी आपले वर्चस्व सिद्ध करायला सुरुवात केली. महाजनांचा करिष्मा खऱ्या अर्थाने राज्यात सत्तांतर झाल्यानंतर कमी झाला त्यातल्या त्यात जळगाव मनपात भाजपच्या नगरसेवकांनी महाजनांना न भिता शिवसेनेची वाट धरली तेव्हा ते अधोरेखित झाले.

तसेच जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने आपली पाळेमुळे रोवण्यासाठी पुढाकार घेतला. राज्यात सत्ता नसली तरी महाआघाडीच्या तंबूत बसून आपल्या हक्कांच्या जागेवर डाव खेळण्यासाठी फासे टाकले. मात्र महाआघाडीने ऐनवेळी डाव खेळला आणि भाजपला बाहेरचा रस्ता दाखवत सर्व जागांवर उमेदवार दिले.

सोमवारी निकालाची बातमी आली तेव्हा काँग्रेसच्या पारड्यात एक जागा वगळता इतर सर्व ठरल्याप्रमाणे निवडून आले. भाजपचे पण खडसेंचे समर्थक असलेले अपक्ष उमेदवार आ.संजय सावकारे वगळता इतर कुणीही जिंकू शकले नाही. आजवरच्या इतिहासात किंवा राज्यातील सहकार बघता राष्ट्रवादी काँग्रेसचीच नेहमी सरशी राहिली आहे. आज जाहीर झालेल्या निकालानंतर महाविकास आघाडी प्रणित सहकार पॅनलने २१ पैकी २० जागा जिंकत आपले वर्चस्व राखले आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

  मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी...

पाचवी व सहावी रेल्वे मार्गिका लवकरच सेवेत

  डोंबिवली : मुंब्रा-कळवा दरम्यानच्या नव्या पाचव्या, सहाव्या रेल्वे मार्गिकेचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. पूर्ण झालेल्या कामांची अंतिम चाचपणी सुरू असून हे काम पूर्ण...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments