R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खरेदी करणार हायड्रोजन कार

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी खरेदी करणार हायड्रोजन कार

 

केंद्रीय रस्ते निर्माण आणि राज्यमार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या व्हर्च्युअल कार्यक्रमात बोलताना सोमवारी एक मोठी घोषणा केली असून यावेळी बोलताना गडकरी यांनी येणाऱ्या पुढील महिन्यात हायड्रोजनवर चालणारी कार खरेदी करत असल्याचे सांगितले आहे. त्यांनी केंद्र सरकार इलेक्ट्रिक वाहनांवर फोकस करतानाचा ग्रीन हायड्रोजन, इथेनॉल, बायोएलएनजी या सारख्या अन्य पर्यायाना महत्व देत असल्याचे सांगितले.

गडकरी म्हणाले देशात पारंपारिक इंजिन वाहन नोंदणी बंद होणार नाही. पण इलेक्ट्रिक वाहन धोरण सरकार वेगाने राबवीत आहे. तसेच देशातील ग्राहकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढली आहे. ग्रीन हायड्रोजन हे भविष्यातील इंधन आहे आणि त्यासाठी सुद्धा सरकार धोरण ठरवीत आहे. गडकरी यांनी ते स्वतः हायड्रोजन कार खरेदी करत आहेत असे यावेळी सांगितले.

ई वाहन विकास केला जात असताना २५० स्टार्टअप या काळात सुरु झाल्याचे सांगून गडकरी म्हणाले, इलेक्ट्रिक वाहने निर्मितीचा खर्च कमी होणार असल्याने ही वाहने सर्वसामान्य लोकांना परवडतील अश्या किमतीत मिळतील. विमानासाठी वापरल्या जाणाऱ्या एटीएफ इंधनात सुद्धा ५० टक्के इथेनॉल वापर करण्यास प्रोत्साहन दिले जात आहे असेही त्यांनी सांगितले.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments