R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात |

शेतकरी नेते रविकांत तुपकरांच्या गाडीला अपघात |

 

सोयाबीन-कापुसप्रश्नी मुंबईत आयोजित केलेल्या बैठकीला जात असताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या गाडीला अपघात झाला आहे. भरधाव वेगाने रस्ता ओलांडताना दुचाकी रविकांत तुपकरांच्या गाडीला धडकल्याने हा अपघात झाला. सदर घटना सोमवारच्या रात्री घडली आहे. या अपघातात दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले आहेत. तर, रविकांत तुपकर हे सुखरुप आहेत. अपघातात जखमी झालेल्या दोन्ही जखमींना घेऊन रविकांत तुपकर औरंगाबादकडे रवाना झाले.

बुलडाणा जिल्ह्यातील बेराळा फाट्याजवळ रात्री १० वाजेदरम्यान शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या इनोव्हा गाडीचा रस्ता क्रॉस करणाऱ्या दुचाकीसोबत अपघात झाला. ही दुचाकी भरधाव वेगाने रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत होती. यादरम्यान, दुचाकीस्वाराचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकी तुपकरांच्या गाडीला येऊन धडकली. या घटनेत गाडीचे मोठे नुकसान झाले आहे.

या अपघातात दुचाकीस्वार दोघेही जखमी झाले आहेत. गजानन सोळंकी आणि तुषार परिहार अशी जखमींची नावे आहेत, ते दोघेही येवता येथील राहणारे आहेत. तर तुपकर यांच्या गाडीचेही या अपघातात खूप नुकसान झाले आहे. पण, तुपकर आणि त्यांचा ड्रायव्हर सुखरुप आहेत. विशेष म्हणजे तुपकरांनी स्वतः या दोन्ही जखमींना तात्काळ चिखली येथे उपचारासाठी आणले आणि तेथून औरंगाबादला पुढील उपचारासाठी घेऊन गेले आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments