R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या एअरटेलपाठोपाठ व्होडाफोन VI ची दरवाढ, २५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार

एअरटेलपाठोपाठ व्होडाफोन VI ची दरवाढ, २५ नोव्हेंबरपासून नवे दर लागू होणार

 

मुंबई | भरती एअरटेल पाठोपाठ आता आर्थिक संकटात सापडलेली व्होडाफोन आयडिया लिमिटेड लवकरच दरवाढ करणार आहे. त्यामुळे २५ नोव्हेंबरपासून व्होडाफोन आयडियाचे प्रीपेड प्लान्स महाग होणार आहे. व्होडाफोन आयडिया प्रीपेड प्लान्सचे दर २५ टक्क्यांनी वाढवणार आहे. त्याआधी एअरटेलनं प्रीपेड प्लान्सच्या किमती वाढवण्याची घोषणा केली आहे. आता व्होडाफोन आयडियानं त्यांच्याच पावलावर पाऊल टाकलं आहे.

प्रती ग्राहक महसूल वाढवण्याचा व्होडाफोन आयडियाचा प्रयत्न आहे. त्यामुळेच कंपनीनं २५ नोव्हेंबरपासून प्रीपेड प्लानचे दर २५ टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. कंपनीचे ११ मोबाईल फोन प्लान्स आणि चार डेटा पॅकेजेसचा दर जवळपास २० टक्क्यांनी वाढणार आहे. व्होडाफोन आयडियाची स्पर्धक कंपनी असलेल्या एअरटेलनं कालच २० ते २५ टक्क्यांची दरवाढ जाहीर केली. एअरटेलचे नवे दर २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. नव्या प्लान्समुळे एआरपीयू वाढेल आणि आर्थिक भार कमी होईल, अशी आशा व्होडाफोन आयडियानं व्यक्त केली.

नव्या दरवाढीमुळे कंपनीला नेटवर्कची क्षमता वाढवता येईल, असंही कंपनीकडून सांगण्यात आलं आहे. दूरसंचार क्षेत्रातील जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, व्होडाफोन आयडियाला एआरपीयू वाढवण्याची नितांत गरज आहे. सध्या कंपनीला मिळणारा एआरपीयू १०९ रुपये आहे. कंपनीला ४जी नेटवर्कचा विस्तार करायचा असल्यास आणि रिलायन्स जिओ, एअरटेलला टक्कर द्यायची असल्यास महसूल वाढ गरजेची आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

शिवसेना यूपीएत जाणार का? संजय राऊतांकडून सस्पेन्स कायम

नवी दिल्ली | शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज दिल्लीत पत्रकारांशी संवाद साधला. राऊत यांनी दिल्लीतील काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट यावर भाष्य...

महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर केलेली टीका शेलारांना भोवणार? महिला आयोगाने घेतली गंभीर दाखल

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी टीका करताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे शिवसेना आणि...

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सरसकट रद्द करा, चंद्रकांत पाटलांचे राज्य सरकारला आव्हान

  सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसी आरक्षणाचा अध्यादेश स्थगित केल्यानंतर राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींच्या जागांची निवडणूक स्थगित ठेऊन इतर जागांची निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments