R.N.I.MAHMAR/2010/33579

Wednesday, December 8, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश बच्चू कडूंची जलसंपदा विभागात अचानक धाड, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई !

बच्चू कडूंची जलसंपदा विभागात अचानक धाड, बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई !

 

जलसंपदा राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पुन्हा एकदा अधिकाऱ्यांना फैलावर घेतल्याची माहिती समोर आली आहे. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या कार्यालयात धाड टाकत अधिकाऱ्यांना जाब विचारले. त्यामुळे अधिकाऱ्यांमध्ये चांगलीच खळबळ उडाली होती. बच्चू कडू हे प्रचंड शिस्तप्रिय आहेत. सर्वसामान्यांसाठी सरकारडून लागू करण्यात आलेल्या लोककल्याणाच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात यासाठी बच्चू कडू यांनी राज्यमंत्री असण्यापूर्वीदेखील त्यांच्या प्रहार संघटनेमार्फत खूप काम केलं आहे. त्यांनी प्रहार संघटनेच्या माध्यमातून अनेक बेशिस्त आणि कामचुकार अधिकाऱ्यांना अद्दल घडवली आहे.

जलसंपदा विभागाचे राज्यमंत्री बच्चू कडू यांनी आज जलसंपदा विभागात धाड टाकली. बच्चू कडू यांनी अचानक टाकलेल्या या धाडीमुळे अधिकाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. विशेष म्हणजे बच्चू कडूंनी जेव्हा धाड टाकली त्यावेळी मुख्य अभियंच्यासह कार्यकारी अभियंता कार्यालयात गैरहजर होते. यावेळी कार्यालयीन कामकाजात अनियनितता आढळल्याने बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना अधिकाऱ्यांची चांगलाच घाम फुटला.

बच्चू कडू यांनी कार्यालयीन कामजात अनियमितता असल्याचं निदर्शनास आल्यानंतर दोन अधिकाऱ्यांवर कारवाई केली आहे. त्यांनी नाशिक जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता चव्हाण आणि कार्यकारी अभियंता भोम्बरे यांची दोन दिवसांचा पगार कपात केला आहे. बच्चू कडूंच्या या झाडाझडतीत जलसंपदा विभागाचा भोंगळ आणि संशयास्पद कारभार चव्हाट्यावर आला आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

स्मार्ट सिटीतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी केंद्रीय नगरविकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आदेश

  ठाणे | ठाणे शहरात राबविण्यात आलेल्या स्मार्ट सिटी योजनेतील गैरव्यवहारांची केंद्र सरकारकडून चौकशी करण्याचे आदेश केंद्रीय नगर विकास मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी आज दिले...

आशिष शेलारांच्या वक्तव्यावर शिवसेना पक्ष आक्रमक होताच, भाजपाची माघार

  मुंबई | मुंबईतील वरळीमध्ये झालेल्या सिलेंडर स्फोट प्रकरणावरून आमदार आशिष शेलार यांनी महापौर किशोरी पेडणेकर यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर सेनेच्या नगरसेवकांनी पोलिसांकडे धाव घेत...

श्रीमंत कोकाटे म्हणतात, नाशिकवर पहिला हक्क शूर्पणखेचा तर भातखळकर म्हणतात,

मुंबई | नाशिकचा पाया खऱ्या अर्थाने शूर्पणखेने घातल्याचा दावा इतिहासकार श्रीमंत कोकाटे यांनी केला होता. मात्र या दवयवरून त्यांच्यावर विरोधकांकडून टीका करण्यात आली होती...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

भाजप आमदार सुरेश धसांचा १ हजार कोटींचा घोटाळा; असीम सरोदे यांचा आरोप

  भाजपचे विधानपरिषद आमदार सुरेश धस यांनी आष्टी येथील वक्फ बोर्ड आणि मंदिर देवस्थान ट्रस्टच्या जवळपास २०० हेक्टर जमिनी हडपून तब्बल १ हजार कोटींचा घोटाळा...

खासदार प्रियांका चुतुर्वेदीं यांची भाजपा आमदारांना नोटीस !l

  मुंबई | : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकेर यांच्याविषयी प्रकरण तापलेले असताना आता शिवसेनेच्या खासदार आणि प्रवक्त्या प्रियांका चतुर्वेदी यांनी आशिष शेलार आणि अतुल भातखळकर...

उत्तरप्रदेश निवडणूक | काँग्रेस स्त्रियांना सरकारी नोकरीत ४० टक्के आरक्षण देणार

उत्तरप्रदेश | उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना आता सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. त्यातच काँग्रेस पक्षाने सुद्धा...

“पोट निवडणूक लढवण्यास मी तयार असलो तरी मातोश्रीवरून जो आदेश येईल तोच अंतिम राहील”

  कोल्हापूर | काही दिवसांपूर्वी कोल्हापूर शहराचे चंद्रकांत आमदार जाधव यांच्या निधनानानंतर रिक्त झालेल्या जागेवर होणाऱ्या पोट निवडणुकीला त्यांची पत्नी जयश्री जाधव यांना उभार करणार...

Recent Comments