R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "शिवसेना मंत्र्याचे थेट राष्ट्रवादीवर गंभीर आरोप"

“शिवसेना मंत्र्याचे थेट राष्ट्रवादीवर गंभीर आरोप”

 

सातारा  | राज्यात शिवसेना पक्षाने राष्ट्रवादी आणि काँग्रेस बरोबर हातमिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले होते मात्र दुसरीकडे कट्टर विरोधक असलेले हे तिन्ही पक्षात स्थानिक पातळीवर वाद होत असल्याचे चित्र अनेकदा दिसून आले होते. तसेच या तिन्ही पक्षातच फोडाफोडीच्या राजकारणाला ऊत आला होता. त्यातच आता पुन्हा एकदा शिवसेना मंत्र्याने रास्तवडीवर गंभर आरोप लगावले आहेत.

राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी राष्ट्रावादी विषयी नाराजीचा सुर आळवला आहे. जिल्हा बँकेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आपण एकत्रित निवडणूक लढवायची, असे निवडणुकीतील अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत सांगितलं जात होतं. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकाही राज्यस्तरीय नेत्याचा आणि जिल्ह्यातील नेत्याचा संपर्क होऊ शकला नाही, असं म्हणत शंभुराज देसाई यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना सुनावलं आहे.

शिवसेनेला जर राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकाकी पाडण्याचा प्रयत्न होत असेल तर आम्ही पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांना सांगून लोकशाहीच्या मार्गाने शिवसेनेच्या वतीनं आम्ही स्वतंत्र्य निवडणुका लढवू, असं शंभूराज देसाई यांनी सांगितलं आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकांवरून शंभुराज देसाई यांनी संताप व्यक्त केला आहे. कोणाच्या मदतीने कोणाचा विजय होतो तर कोणाचा पराभव होतो. प्रत्येकवेळी राजकारण मात्र वेगळ असतं. मी माझा पराभव खिलाडू वृत्तीने स्वीकारत आहे, असं शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. 102 मतांच्या निवडणुकीला पराभव असं म्हणता येणार नाही, असंही शंभूराज देसाई म्हणाले आहेत.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments