R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश कोल्हापुरात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !

कोल्हापुरात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान !

 

कोल्हापूर | कोल्हापूर शहर आणि ग्रामीण भागात आज सकाळपासून (बुधवारी) जोरदार पावसाला सुरुवात झाली. मागच्या दहा दिवस कमी अधिक प्रमाणात पडणाऱ्या या अवकाळी पावसाने नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम केला आहे, तसेच शेतकऱ्यांचेही नुकसान केले आहे. आज पहाटे थोडे धुके पडले होते, जसजसा दिवस वर जाईल, तसे आकाशात काळे ढग जमायला लागले.

त्यानंतर सकाळी साडे सात वाजल्या पासून प्रत्यक्ष पावसाची रिपरिप सुरु झाली. कळावंडलेलं वातावरण आणि वरून पडणारा पाऊस यामुळे सकाळच्या नागरिकांच्या धावपळीवर परिणाम झाला. साडे आठ नंतर तर पावसाने अधिकच जोर धरला. सुमारे अर्धा तास चांगलेच झोडपले. या अवकाळी पावसाने जनजीवन बिघडले असून शेतकरी वर्ग अडचणीत सापडला आहे.

साखर कारखाने सुरु झाले असून ऊस तोडणी सुरु झाली असताना पावसाने विघ्न निर्माण केले आहे. पावसाने ऊस तोडणी कमी होत आहे, त्याचा गाळापावर परिणाम होऊ लागला आहे. एकीकडे उसाची तोडणी सुरु असून साखर कारखान्याला पाठवण्याच्या लगबगीत बळीराजा असताना अवकाळी पडलेल्या पावसामुळे बळीराजा संकटात आला आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments