R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश 'या' आमदाराने दिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा !

‘या’ आमदाराने दिला राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा !

 

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे. बाबाजानी दुर्रानी यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने चर्चांना उधाण आले आहे. दरम्यान पक्षाअंतर्गत राजकारण आणि गटबाजीला कंटाळून राजीनामा दिला असल्याचं बोललं जात आहे. बाबाजानी दुर्रानी यांच्या या निर्णयामुळे राष्ट्रवादला मोठा फटका बसला आहे. दुर्रानी यांनी पक्षात असलेला अंतर्गत वाद आणि गटबाजी यालाच कंटाळून त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.

येत्या काळात स्थानिक निवडणुका होणार आहेत आणि त्यापूर्वीच बाबाजानी दुर्रानी यांनी राजानामा दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी हा एक मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. बाबाजानी दुर्रानी हे विधानपरिषदेचे आमदार आणि परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. मात्र, त्यांनी आता आपल्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे सोपवला आहे.

बाबाजानी दुर्रानी यांच्या या निर्णयामुळे येत्या निवडुकांत राष्ट्रवादीची डोकेदुखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. काही दिवसांपूर्वी झाली होती मारहाण आमदार बाबाजानी दुर्राणी यांना एका व्यक्तीनं मारहाण केल्याची घटना नुकतीच समोर आली होती. मारेकरी एवढ्यावरच थांबला नाही तर, त्याने आमदाराला जीवे मारण्याची धमकी देखील दिली आहे. या धक्कादायक प्रकारानंतर परिसरात तणाव निर्माण झाला होता. याप्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments