R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा !

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंना मंत्रिपद मिळण्याची चर्चा !

 

मुंबई | महाराष्ट्रात असलेल्या ठाकरे सरकारमध्ये येत्या काळात फेरबदल होण्याची चर्चा सुरू झाली आहे. या फेरबदलात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनाही मंत्रिपद मिळणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे काँग्रेस नेते दिल्ली दौऱ्यावर जात असून दिल्लीत या संदर्भात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. मात्र या वादामुळे काँग्रेसच्या एका मंत्र्यांचे पद जाणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, राज्य विधानसभा अध्यक्षपद अद्यापही रिक्तच आहे. या पदावर कुणाची निवड करावी या संदर्भातही दिल्ली दौऱ्यात चर्चा होणार असल्याचं बोललं जात आहे. त्यानंतर येत्या हिवाळी अधिवेशनात विधानसभा अध्यक्षपदाची निवड करण्यात येईल असंही बोललं जात आहे. समोर आलेल्या माहितीनुसार ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्या कार्यावर पक्षातील नेते नाराज असून त्यांचे खाते इतर कुणाला तरी दिले जाणार असल्याची चर्चा यापूर्वी रंगली होती.

मात्र, याला कुणीही दुजोरा दिला नव्हता. याव्यतिरिक्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या प्रणिती शिंदे यांचंही नाव चर्चेत आहे. प्रणिती शिंदे यांना राज्यमंत्रीपदी संधी मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन त्यांच्या जागेवर नाना पटोले यांना मंत्रिपद दिलं जाणार असल्याचं बोललं जात आहे. तर एका राज्यमंत्रिपदावरही अदलाबदल होण्याची चर्चा होत आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments