R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश एसटी महामंडळाच्या संपात वायरल मॅसेजमुळे पडळकर-खोत संशयाच्या भूमिकेत

एसटी महामंडळाच्या संपात वायरल मॅसेजमुळे पडळकर-खोत संशयाच्या भूमिकेत

 

एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी मागच्या दोन आठवड्यापासून कर्मचारही आंदोलन करत असून अद्याप या आंदोलनावर तोडगा निघालेला नाहीये त्यातच रयत क्रांती संघतेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत आणि आमदार गोपीचंद पडळकर हे कर्मचाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून या आंदोलनात सहभागी झाले आहे. मात्र आता वायरल झालेल्या मॅसेजमुळे पडळकर-खोत संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका मेसेजमुळं एसटी कर्मचाऱ्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. व्हायरल मेसेजमध्ये हे दोन्ही नेते मॅनेज झाल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा मेसेज व्हायरल झाल्यानंतर दोन्ही नेत्यांनी आंदोलनातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तुमचा विश्वास नसेल तर आम्ही घरी जातो, असं यावेळी या दोन्ही नेत्यांनी सांगितलं. यानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी खोत व पडळकर यांना अडवलं आणि त्यांना खांद्यावर उचलून घेत जोरदार घोषणाबाजी सुरू केली. एका व्हायरल मेसेजमुळे पडळकर आणि खोत यांच्यावर संशयाचं वातावरण निर्माण झालं होतं. पण, आता सर्व प्रकरण शांत झालं आहे.

एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या निर्णय़ावर एसटी कर्मचा-यांचं म्हणणं काय आहे, याचा निर्णय आज सकाळी एसटी कर्मचारी घेणार आहेत. परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष अनिल परब यांच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे एसटी कर्मचाऱ्यांची बैठक सुरू झाली आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यासह एसटीचे कर्मचारी उपस्थित आहेत. या बैठकीत संपाबाबत महत्वाचा निर्णय होऊ शकते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments