R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश २०२४ ला शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाणार तुम्ही बघाच' या नेत्याने केला दावा

२०२४ ला शिवसेना पुन्हा भाजपासोबत जाणार तुम्ही बघाच’ या नेत्याने केला दावा

 

मुंबई | २०१४ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षाने भाजपाबरोबर युती तोडून काँग्रेस आणि राष्ट्रवादी बरोबर हातमिळवणी करून सत्ता स्थापन केली होती. मात्र मागच्या काही दिवसांपासून शविसेना नि भाजपा युतीबद्दल विधाने राजकीय वर्तुळात होताना दिसून येत आहे. यातच आता एआयएमआयएमचे पक्षप्रमुख आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी शिवसेना आणि भाजपबाबत एक भविष्यवाणी केली असून, २०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच, असा मोठा दावा केला आहे.

थ्री इन वन आहे की टू इन वन आहे काही कळत नाही. धर्मनिरपेक्षता म्हणजे चेष्टा वाटली का यांनी? याला धर्मनिरपेक्षता म्हणतात का? शिवसेनेला सत्ता देऊन तुम्ही धर्मनिरपेक्षतेविषयी बोलता का, या शब्दांत ओवेसी यांनी धर्मनिरपेक्षतेच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडले. ते सोलापुरात बोलत होते. मात्र त्यांच्या दाव्यानंतर पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चेला विषय मिळाला आहे.

एमआयएमसोबत गेले तर जातीयवाद मग राहुल गांधींनी हिंमत असेल तर उत्तर द्यावे? महाराष्ट्रात काय सुरु आहे? १९९२ ला काय झाले होते हे लोक अजून विसलरलेले नाहीत. असे असताना महाराष्ट्र राज्यात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांची महाविकासआघाडी अस्तित्वात आली. ही महाविकास आघाडी अस्तित्वात आल्यापासून या आघाडीच्या विचारधारेवर प्रश्नचिन्ह आहे. परस्पर विरोधी विचारधारेचे तीन पक्ष एकत्र कसे येऊ शकतात. २०२४ मध्ये शिवसेना पुन्हा भाजपसोबत जाईल, तुम्ही बघाच, असा मोठा दावा ओवेसी यांनी यावेळी बोलताना केला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments