R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया धक्कादायक | अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार;

धक्कादायक | अल्पवयीन बहीण-भावावर तरुण जोडप्याचा बलात्कार;

 

ठाणे | मागच्या काही दिवसांपासून महिलांवर आणि विशेष करून अल्पवयीन मुलांवर होणाऱ्या अत्याचारांच्या घटना वाढल्या आहेत. यानंतर आता ठाणे जिल्ह्यातील कल्याण शहरात अशीच एक माणुसकीला काळिमा फासणारी विकृत घटना समोर आली आहे. कल्याण पूर्व भागात एका तरुणीने चक्क एका अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केला आहे. आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने पीडित मुलाच्या अल्पवयीन बहिणीवर प्रियकराद्वारे अत्याचार करण्यास भाग पाडलं आहे.

कोळशेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा धक्कादायक आणि विकृत प्रकार घडला आहे. येथील एका २३ वर्षीय तरुणीने १४ वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार केले आहेत. ही विकृत तरुणी पीडित अल्पवयीन मुलाची नातेवाईक आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही तरुणी पीडित अल्पवयीन मुलाचं जबरदस्तीनं लैंगिक शोषण करत होती. तसेच घटनेची वाच्यता न करण्यासाठी आरोपी तरुणी अल्पवयीन पीडित मुलाला धमकावत होती. म्हणूनच गेल्या काही महिन्यांपासून पीडित मुलानं या घटनेची वाच्यता कुठेही केली नाही.

आरोपी तरुणी एवढ्यावरच थांबली नाही, तर तिने आपल्या प्रियकराकडून पीडित अल्पवयीन मुलाच्या १६ वर्षीय अल्पवयीन बहिणीवर देखील लैंगिक अत्याचार करायला भाग पाडलं आहे. या विकृत तरुणीच्या प्रियकराने देखील पीडित अल्पवयीन मुलीवर सातत्यानं लैंगिक अत्याचार केले आहेत. घटनेची वाच्यता केल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी पीडित अल्पवयीन बहीण-भावाला दिली जात होती. त्यामुळे हा धक्कादायक प्रकार समोर येत नव्हता.

मात्र आदिक त्रास होऊ लागल्यामुळे आरोपींच्या अत्याचाराच्या त्रासाला कंटाळलेल्या पीडित अल्पवयीन भाऊ-बहिणीनं मोठ्या धाडसानं आपल्यावर होणाऱ्या अत्याचाराची कहाणी कुटुंबीयांना सांगितली आहे. यानंतर नातेवाईकांनी कल्याण पूर्वेतील कोळशेवाडी पोलीस ठाण्यात यासंदर्भात फिर्याद दिली. सध्या त्या दोन्ही आरोपांना अटक करण्यात आलेली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

लेकाच्या लग्नात गुलाबराव पाटलांचा भन्नाट डान्स होत आहे व्हिडिओ वायरल

  जळगाव | शिवसेना खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांचा डान्सचा व्हिडीओ समोर आला होता. राऊत यांनी मुलीच्या लग्नातील संगीत कार्यक्रमात...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

Recent Comments