R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश रोहित पवारांनी तीन वेळा केलीय चूक ! भाजप नेत्याने केले गंभीर आरोप

रोहित पवारांनी तीन वेळा केलीय चूक ! भाजप नेत्याने केले गंभीर आरोप

 

नगर | कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियम आणि जिल्हाधिकाऱ्यांनी लागू केलेले नियम मोडून कर्जत-जामखेड मतदारसंघात तेथील लोकप्रतिनिधीच विविध कार्यक्रम आयोजित करीत आहेत. आतापर्यंत असे तीन वेळा झाले आहे. त्यामुळे कर्जत-जामखेड वगळून हे नियम आहेत का? तसे नसेल तर तेथील राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर प्रशासन कारवाई करणार का?’, असा सवाल भाजप प्रदेश उपाध्यक्ष, माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी केला आहे.

बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी कर्जत-जामखेडमधील विविध कार्यक्रमांकडे लक्ष वेधून हा आरोप केला. शिंदे म्हणाले, ‘नगरचे जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी जिल्ह्यात २२ ते २८ नोव्हेंबरपर्यंत फौजदारी प्रक्रिया संहितामधील कलम १४४ नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी करून जमावबंदीचा आदेश दिला आहे.

असे असले तरी कर्जतमध्ये आमदार पवार यांनी एका मोठ्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. बंदी आदेश असूनही असा कार्यक्रम कसा घेता येईल? त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई केली जाणार का? की या आदेशातून कर्जत-जामखेडला वगळले आहे? याचा खुलासा प्रशासनाने करावा.

आमदार रोहित पवार यांची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी करोना काळातही त्यांनी अनेकदा नियम मोडले आहेत. बंदीचा आदेश लागू असताना खर्डा येथे किल्ल्यासमोर भगवा झेंडा उभारण्यासाठी मोठा कार्यक्रम घेतला होता. तिन्ही वेळा आमदार पवार यांच्यावर प्रशासनाकडून कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे आता प्रशासनाने यासंबंधीची भूमिका जाहीर करावी,’ अशी मागणीही शिंदे यांनी केली आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

डोंबिवलीत परदेशातून आलेल्या त्या ६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह

  कल्याण-डोंबिवली | पुन्हा एकदा राज्याची चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे.हे. त्यामुळे आरोग्य यंत्रणा अधिक सतर्क झाली आहे. तसेच लोकांमध्येही भितीचं वातावरण आहे. परदेशातून...

राहुल गांधींवर टीका करणाऱ्या ममता बॅनर्जींना नाना पटोलेंनी दिले सडेतोड प्रतिउत्तर

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका केल्यानंतर राज्यातील काँग्रेसचे नेते चांगलेच चवताळले आहे. 'वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश...

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments