R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या "एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा खून शरद पवारांनी केला"

“एसटी कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा खून शरद पवारांनी केला”

 

मुंबई | एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे या मागणीसाठी राज्य सरकार विरोधात एसटी कर्मचारी अंदोलन करत असून या आंदोलनाला आता हिंसक वळण लागले आहे. दोन दोन वेळेस चर्चा होऊन सुद्धा तसेच पगारवाढ होऊन सुद्धा विलीनीकरणाच्या मुद्द्यावर एसटी कारभारी ठाम आहेत. त्यातच आता एसटी कर्मचाऱ्यांच्या बाजूने कोर्टात बाजू मांडणारे वकील गुणरत्न सदावर्तें यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे सर्वेसरा शरद पवारांवर निशाणा साधला आहे.

वकील गुणरत्न सदावर्ते म्हणाले की, सरकारनं घाणेरडं राजकारण केले. आमची मागणी विलिनीकरणाची आहे. पगारवाढीची नाही. वरिष्ठ श्रेणीला अडीच हजार आणि कनिष्ठ श्रेणीला ७ हजार पगारवाढ आहे. २ आमदारांचीही फसवणूक केली. विरोधी पक्षाने कर्मचाऱ्यांचा आवाज विधानसभेत मांडावा.

आज तागायत ४० एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या झाल्या त्यावर शरद पवार गप्प बसले. कर्मचाऱ्यांच्या विश्वासाचा खून करण्याचं काम शरद पवारांनी केले. सरकार किती असंवैधानिक असू शकतं हे अनिल परब यांनी मान्य केले. पगार वेळेवर न देणारं सरकार किती खोटं बोलू शकतं हे दिसून येते. विलिनीकरण करण्याचा निर्णय घेऊ नका असं न्यायालयाने म्हटलं नाही असं त्यांनी सांगितले.

तसेच एसटी कर्मचारी कुठल्याही प्रकारे माघार घेणार नाही. जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोवर एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरुच राहणार आहे. सरकारने महाराष्ट्राच्या कष्टकऱ्यांचा अपमान केला आहे. ४० कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या प्रेतावर सरकारनं तांडव करण्याचं पाप केले आहे अशी टीकाही गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments