R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया बंटी-बबली माझे काही वाकडे करू शकणार नाही, काँग्रेसच्या या नेत्यांची जितेंद्र आव्हाड...

बंटी-बबली माझे काही वाकडे करू शकणार नाही, काँग्रेसच्या या नेत्यांची जितेंद्र आव्हाड यांच्यावर टीका

 

ठाणे | राज्यात एकीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षाची सत्ता स्थापन झालेली असताना शुद्धया तिन्ही पक्षात स्थानिक पातळीवर वाद होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यातच आता काँग्रेस नेते मुझफ्फर हुसेन यांनी राष्ट्रवादीचे नेते तथा गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा समाचार घेतला आहे. मंत्री आव्हाड यांनी मीरारोडच्या नया नगर मधील जाहीर सभेत मुझफ्फर यांचे नाव न घेता त्यांना सुलतान ए आझम व सुलतान ए नया नगर असा टोला लावत त्यांची सल्तनत खालसा करण्याचे आवाहन केले होते . त्या वरून मुझफ्फर यांनी आव्हाड यांचा खरपूस समाचार घेतला आहे .

एकीकडे मित्रपक्षाच्या नेत्या विरोधात बोलायचे आणि दुसरी कडे काँग्रेस व महाआघाडी विरोधात बोलत नाही असे म्हणतात . भाजपाला पराभूत करायचे असेल तर सर्वानी एकत्र येऊन महाविकास आघाडी पालिका निवडणुकीत झाली पाहिजे, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको असे सांगतात आणि दुसरीकडे काँग्रेसच्या १२ नगरसेवकांना पाडायची भाषा करतात . ह्यावरून बंटी – बबली स्वतः कन्फ्युज आहेत किंवा लोकांना कन्फ्युज करून भाजपाला फायदा करून देण्याचा त्यांचा हेतू असावा असा टोला मुझफ्फर यांनी लगावला.

सत्ता नसताना दोन वर्षां पूर्वी त्यांनी अधिवेशनात आलिशान क्लब प्रकरणी भाजपा नेत्यावर आरोप केले होते त्या बाबत आज सत्ता येऊन दोन वर्षे उलटली तरी ते चिडीचूप आहेत असे पत्रकारांनीच त्यांना विचारून संशय व्यक्त केला आहे . आमचे मीरारोड हे देशातले विकसित शहर आहे . एक किलो मीटरच्या परिसरात मोठे रस्ते , सुशोभित रेल्वे स्थानक , सरकारी रुग्णालय – रक्तपेढी , वाचनालय , अत्याधुनिक सुसज्ज रुग्णालय , उच्च शिक्षणा साठी विविध महाविद्यालये , मैदान , उद्याने हे मीरारोड मध्ये आहे . आधी मुंब्रा – कौसा कडे बघा असा चिमटा मुझफ्फर यांनी आव्हाड यांचे नाव न घेता काढला.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments