R.N.I.MAHMAR/2010/33579

Sunday, December 5, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरे हिला ठाणे महानगरपालिकेने दिले हक्काच घर.

रेल्वे अपघातात पाय गमावणाऱ्या रुणाली मोरे हिला ठाणे महानगरपालिकेने दिले हक्काच घर.

 

ठाणे | रेल्वे अपघातात आपले दोन्ही पाय गमावलेल्या रुणाली मोरे ( वय 14) हिला ठाणे महानगरपालिकेच्या वतीने हक्काचे घर देऊन शिवसेनेने आपला शब्द पाळला आहे. आज राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते तिला नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

स्वातंत्रदिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 14 ऑगस्ट रोजी कामानिमित्त घराबाहेर पडलेली रुणाली ही ट्रेन मध्ये चढली, मात्र त्याचवेळी गर्दीचा धक्का लागून ती लोकलच्या खाली पडली. या दुर्घटनेत दुर्दैवाने तिला आपले दोन्ही पाय गमवावे लागले होते. या दुर्घटनेची माहिती मिळताच एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन तिची भेट घेतली होती. यावेळी त्यांनी तिच्या उपचाराचा पूर्ण खर्च उचलून तिच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. यासोबतच शिवसेनेच्या वतीने तिला पुन्हा तिच्या पायावर उभे करण्याचे आश्वासन दिले होते. तसेच तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील पक्षाच्या वतीने करण्यात येणार असल्याचे त्यांनी जाहीर केले होते.

मूळच्या मानपाडा येथे राहणाऱ्या रुणाली कडे हक्काचं घर नव्हते. त्यामुळे तिची ही अडचण दूर करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने तिला ठाण्यात घर देण्याचा निर्णय घेण्यात आला. आज श्री. शिंदे यांच्या निवासस्थानी रुणाली हिला तिच्या या नवीन घराची चावी सुपूर्द करण्यात आली.

रुणाली हिच्यावर नियतीने घाला घातला असला तरीही तीला पुन्हा तिच्या पायवर उभे करण्याची जबाबदारी शिवसेनेने घेतली आहे. डॉक्टर बनण्याचे तिचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिच्या पुढील शिक्षणाचा खर्च देखील शिवसेनेने उचलला होता. आता तिला हक्काच घरकुल देऊन तिच्यासमोरील निवाऱ्याचा प्रश्नही निकाली काढला आहे. ठाणे महानगरपालिकेच्या मदतीने तिला ठाण्यात घरकुल उपलब्ध करून देऊन शिवसेनेने आपला दिलेला शब्द पाळला असल्याचे एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितले.

यावेळी कल्याण डोंबिवलीचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, ठाणे महानगरपालिकेचे सभागृह नेते अशोक वैती, ज्येष्ठ नगरसेवक दिलीप बारटक्के आणि शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे उपस्थित होते.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

“लिंबाच्या रसाचे दोन थेंब सेवन केल्यास कोरोनावर लगेचच मात करता येऊ शकते” या नेत्याचा अजब दावा !

  भाजपा नेते सतत वादग्रस्त विधान करून स्वतःच्या आणि पक्षाच्या अडचणीत वाढ करून घेत असताना अनेकदा दिसून आले आहेत. त्यातच कोरोनाच्या संसर्गात भाजपा नेत्यांनी यापूर्वी...

जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात महत्वपूर्ण बैठक !

  कोल्हापूर | कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध करण्यासंदर्भात आमदार पी एन पाटील, आमदार विनय कोरे आणि आमदार प्रकाश आवाडे यांची एक महत्वपूर्ण बैठक...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

‘लोकसत्ता’चे संपादक तथा ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

  नाशिक | नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली असून या प्रकरणाची संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी...

ओमिक्रॉनबाबत राज्य सरकार सतर्क, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार टास्क फोर्सशी चर्चा

  मुंबई | कर्नाटक, गुजरात पाठोपाठ महाराष्ट्रातही ओमिक्रॉन वेरिएंटचा रुग्ण आढळल्याचे समोर आल्यानंतर राज्य सरकार सतर्क झाले आहे. डोंबिवलीतील युवकाला ओमिक्रॉन वेरिएंटचा संसर्ग झाला असल्याने...

ममतांचा मुंबई दौरा महाराष्ट्राला सुखावणारा, संजय राऊतांचं ‘रोखठोक’ मत

  मुंबई | तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्ष आणि बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मंगळवारी संध्याकाळी मुंबईत आल्या. विमानतळावरून त्या थेट प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरात गेल्या. मंदिराबाहेर येऊन त्यांनी...

हे उपाय केले तर तुमच्या ब्लड प्रेशरच्या गोळ्या होतील कायमच्या बंद

  धकाधकीच्या आणि व्यास वेळामुळे आपल्या उत्तम आहार ,योग्य व्यायाम व पुरेशी झोप ही सुखी जीवनाची सोपी त्रिसूत्री कित्येकदा आपल्या लक्षात देखील राहत नाही. याच...

Recent Comments