R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, November 29, 2021

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या '26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबला मदत केली

’26/11 हल्ल्यावेळी परमबीर सिंहांनी कसाबला मदत केली

 

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सचिन वाझे मार्फत १०० कोटी हप्ता वसुलीचा आरोप लगावून एकाच खळब उडवून देणारे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह मागच्या काही दिवसांपासून फरार होते. तसेच ते विदेशात पळून गेल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसून येत होते. त्यातच त्यांच्या वकिलांनी ते भारतात असल्याचे जाहीर केले होते.परमबीर सिंह हे मुंबईत दाखल झाले आहेत.

त्यातच पाठोपाठ आता एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप लगावले आहेत. 26 नोव्हेंबर 2008 रोजी मुंबईत मोठा दहशतवादी हल्ला झाला होता त्यावेळी मुंबई पोलिसांनी पाकिस्तानमधून आलेला दहशतवादी अजमल कसाब या दहशतवाद्याला जिवंत पकडलं होतं. अशातच आता मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.

मुंबई पोलीसमधील निवृत्त एसीपी शमशेर खान पठाण यांनी परमबीर सिंह यांच्यावर खळबळजनक आरोप केला आहे. ज्यावेळी कसाबला जिवंत पकडण्यात आलं होतं. त्यावेळी परमबीर सिंह यांनी कसाबचा मोबाईल गायब केला होता आणि कसाबला मदत केली, असा आरोप शमशेर खान पठाण यांनी केला आहे. शमशेर खान पठाण यांनी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना एक पत्र लिहिलं. त्यांत त्यांनी हा खळबळजनक खुलासा केला आहे.

तत्कालिन वरिष्ठ पीआय यांनी कसाबकडून एक फोन सापडल्याचं म्हटलं होतं. तो फोन पोलीस हवालदार कांबळे यांच्याकडे ठेवण्यात आला होता. त्यानंतर गिरगाव चौपाटीच्या सिग्नलजवळ परमबीर सिंह आले आणि त्यांनी तो फोन स्वत:जवळ ठेवला, असं शमशेर खान पठाण यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

राष्ट्रवादी काँग्रेस आमदाराचा पराभव करणाऱ्या रांजनेंचा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांकडून सत्कार

  सातारा | सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्ञानदेव रांजणे यांनी दबावावर मात करून विजय मिळवत इतिहास निर्माण केलाय. संघर्षावर मात करून रांजणे...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

  मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती...

विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ ते २८ डिसेंबर दरम्यान मुंबईत

  मुंबई | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यवर झालेली शस्त्रक्रिया तसेच कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यंदा सुद्धा विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन २२ डिसेंबर ते २८ डिसेंबर २०२१ दरम्यान...

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

  डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा...

विकी कौशल आणि कतरीना कैफच्या लग्नाला हे सेलिब्रिरी लावणार हजेरी

  मुंबई | अभिनेता विकी कौशल आणि कतरिना कैफच्या यांच्या लग्नाबाबत रोज नवे अपडेट समोर येत आहेत. त्यात आताही एक नवीन अपडेट आली आहे. सध्या...

Recent Comments