R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश डोंबिवली मधील एमआयडीसीतील कंपन्यांना अपुरा पाणीपुवठा उद्योजकांनी केली तक्रार

डोंबिवली मधील एमआयडीसीतील कंपन्यांना अपुरा पाणीपुवठा उद्योजकांनी केली तक्रार

 

डोंबिवली : डोंबिवली औद्योगिक, निवासी क्षेत्राला अनेक महिन्यांपासून कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे.कंपन्यांना उत्पादनासाठी लागणाऱ्या प्रमाणापेक्षा कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने उत्पादनावर त्याचा परिणाम होतो, अशा तक्रारी उद्योजकांनी केल्या आहेत. डोंबिवली औद्योगिक क्षेत्रात ६५० रासायनिक, कापड उद्योग, अभियांत्रिकी, इलेक्ट्रिक उत्पादनांच्या कंपन्या आहेत. रासायनिक, कापड प्रक्रिया उद्योगासाठी सर्वाधिक पाणी लागते.

या कंपन्यांना एमआयडीसीकडून त्यांच्या मागणीप्रमाणे पाणीपुरवठा केला जातो. गेल्या काही महिन्यांपासून कंपन्यांना कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. उद्योजकांना मुबलक पाणी मिळत नसल्याने उत्पादन कमी घ्यावे लागते. दररोज खासगी पुरवठादारांकडून पाणी खरेदी करणे शक्य होत नाही. उद्योजकांना वेळेत उत्पादन करून त्याची देशात, परदेशात पाठवणी करावी लागते. मुबलक पाणीपुरवठा कंपन्यांना होत नसल्याने अनेक उद्योजक अडचणीत आले आहेत, अशी माहिती कल्याण अंबरनाथ मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष देवेन सोनी यांनी दिली.

परदेशस्थ अनेक कंपन्यांनी उत्पादनासाठी डोंबिवलीतील कंपन्यांबरोबर करार केले आहेत. परदेशस्थ उद्योजक कंपन्यांच्या प्रतिनिधींना स्थानिक कंपनीत पाणीटंचाई, खंडित वीजपुरवठा अशा काही त्रुटी आढळून आल्या की त्याचे अहवाल ते आपल्या परदेशातील कंपन्यांना देतात, त्याचा परिणाम कंपनीच्या नाममुद्रेवर होतो, असे उद्योजकांनी सांगितले.

एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी उद्योजकांची अडचण विचारात घेऊन काटई ते एमआयडीसीदरम्यान ७५० मिलिमीटर व्यासाची जलवाहिनी टाकण्याचे आश्वासन दोन वर्षांपूर्वी दिले होते. त्याची अंमलबजावणी सुरू केली आहे. करोनाकाळात रेंगाळलेल्या कामाने आता गती घेतली आहे. लवकरच हे काम पूर्ण होऊन एमआयडीसी क्षेत्राला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, असे आश्वासन एमआयडीसी अधिकाऱ्यांनी उद्योजकांना दिले आहे, असे सोनी यांनी सांगितले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

धनंजय मुंडे यांची तक्रार करण्यासाठी येत असलेल्या किरीट सोमय्या यांना धमक्या

  बीड | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीटी सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्या अडचणीत...

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी! न्यायालयाने केले राज्य सरकारच कौतुक

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या स्थितीशी महाराष्ट्र सरकारने यशस्वीपणे सामना केला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक...

” मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत”

  मुंबई | मोदी सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे पण मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने 'जुमला'...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments