R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश "निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल"

“निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल”

 

मुंबई |  राज्यात आघाडीचे सरकार कोसळेल अशी भविष्यवाणी सतत विरोधक करताना दिसून येत आहे. त्यातच आता सरकार आज पडणार, उद्या पडणार अशी दिवास्वप्ने वीरोधकांनी पाहिली. संभाव्य तारखा जाहीर केल्या, तरीसुद्धा विरोधी पक्षाला महाविकास आघाडी सरकारच्या केसालाही धक्का लावता आलेला नाही. सरकारने दोन वर्षेही पूर्ण केली. मात्र जर निवडणुका झाल्या तरी जनतेचा कौल महाविकास आघाडीलाच मिळेल, असे ‘मूड महाराष्ट्राचा’ या सर्वेक्षणातून सिद्ध झाले आहे.

आघाडीतील सर्व पक्ष स्वतंत्र लढले तरी शिवसेनेला किमान ७७ जागा मिळतील असेही हे सर्वेक्षण सांगते. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकारने दोन वर्षे पूर्ण केली. महाविकास आघाडीला जनतेतूनही चांगला पाठिंबा मिळत आहे. आज जर निवडणुका झाल्या तर काय होईल? जनता कोणाच्या बाजूने मत देईल? याचा अंदाज सकाळ व साम टीव्ही यांनी ‘मूड महाराष्ट्राचा’ या सर्वेक्षणाच्या माध्यमातून घेतला.

चर्चा, सरकारची कामगिरी, सरकारची जनतेमधील प्रतिमा याबद्दल शहरी आणि ग्रामीण जनतेकडून जाणून घेतले गेले. त्यातून असे दिसून आले की, भाजपला पुढच्या वेळीही विरोधी पक्षामध्येच बसावे लागणार आहे. विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि महाविकास आघाडी एकत्रपणे लढली तर किमान 178 जागा मिळतील. भाजपला 101 जागा मिळतील आणि इतरांना 9 जागा मिळतील असा निष्कर्ष या सर्वेक्षणातून काढण्यात आला आहे.

 

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

धनंजय मुंडे यांची तक्रार करण्यासाठी येत असलेल्या किरीट सोमय्या यांना धमक्या

  बीड | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीटी सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्या अडचणीत...

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी! न्यायालयाने केले राज्य सरकारच कौतुक

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या स्थितीशी महाराष्ट्र सरकारने यशस्वीपणे सामना केला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक...

” मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत”

  मुंबई | मोदी सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे पण मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने 'जुमला'...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments