R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home प्रदेश स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

स्वच्छ सर्वेक्षणात बदलापूर अव्वल, राज्यात दुसरा,देशात १४वा क्रमांक

बदलापूर | स्वच्छ सर्वेक्षणात भरारी घेत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने यंदा राज्यातून दुसरा, तर देशातून १४वा क्रमांक पटकावला आहे. तीन वर्षांत कुळगाव-बदलापूर नगर परिषदेने स्वच्छ सर्वेक्षणात टप्प्याटप्प्याने प्रगती करीत यंदा सुयश मिळवले आहे. गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ अमृत सन्मान समारोह-स्वच्छ सर्वेक्षण-२०२१’ या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या उपस्थितीत केंद्रीयमंत्री, शहरी कार्य मंत्रालय आणि केंद्रीय सचिव, शहरी कार्य मंत्रालय यांच्या हस्ते कचरामुक्त तारांकित शहर स्टार मानांकनात कुळगाव-बदलापूर शहराला ‘थ्री स्टार’ मानांकन प्रदान करण्यात आले.

विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे सन्मान पुरस्कार स्वीकारण्यासाठी कुळगाव-बदलापूर नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी योगेश गोडसे, आरोग्य विभागप्रमुख तथा स्वच्छ भारत अभियान नोडल अधिकारी वैशाली देशमुख, स्वच्छ भारत अभियान सिटी-कोऑर्डिनेटर युवराज झुरंगे उपस्थित होते.

स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या वतीने गृहनिर्माण व शहरी कार्य मंत्रालय यांच्याद्वारे देशस्तरावर दरवर्षी स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा घेण्यात येते. तत्कालीन प्रशासक तथा मुख्याधिकारी दीपक पुजारी यांच्या कार्यकाळात स्वच्छ सर्वेक्षण-२०२१ मध्ये कचरामुक्त तारांकित शहर स्पर्धेसाठी पालिकेने घनकचरा व्यवस्थापन सुलभ आणि पर्यावरणस्नेही व्हावे म्हणून अनेक प्रयत्न केले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

धनंजय मुंडे यांची तक्रार करण्यासाठी येत असलेल्या किरीट सोमय्या यांना धमक्या

  बीड | राज्यात आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून भाजपा नेते आणि माजी खासदार किरीटी सोमय्या यांनी महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांचे घोटाळे बाहेर काढत त्यांच्या अडचणीत...

कोरोनाची परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी! न्यायालयाने केले राज्य सरकारच कौतुक

  मुंबई | कोरोना संसर्गाच्या स्थितीशी महाराष्ट्र सरकारने यशस्वीपणे सामना केला आहे. ही परिस्थिती हाताळण्यात महाराष्ट्र अग्रस्थानी आहे, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारचे कौतुक...

” मोदी सरकारने शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने ‘जुमला’ ठरु नयेत”

  मुंबई | मोदी सरकारनं दिलेल्या लेखी आश्वासनानंतर शेतकरी संघटनांनी आंदोलन थांबवण्याचा निर्णय घेतला आहे पण मोदी सरकारचा आतापर्यंतचा अनुभव पाहता शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने 'जुमला'...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments