R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया कृषी कायदे रद्द करणार विधेयक लोकसभेत मंजूर, आता राकेश टिकैत म्हणतात की..

कृषी कायदे रद्द करणार विधेयक लोकसभेत मंजूर, आता राकेश टिकैत म्हणतात की..

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी कृषी कायदे मागे घेण्याचे आव्हान केल्यानंतर आज अखेर कृषी कायदा अखेर मागे घेण्यात आले आहे. तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर करण्यात आलं. संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी ही विधेयकं रद्द करण्यात आली. यावेळी लोकसभेत प्रचंड गोंधळ झाला. दरम्यान, शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी लोकसभेत कृषी कायदा परत घेण्याचे विधेयक मंजूर झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला.

राकेश टिकैत यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक लोकसभेत मंजूर झाल्याचा खूप आनंद आहेच. पण, आमचे सातशे शेतकरी बांधव शहीद झाले, त्यामुळे आनंदोत्सव साजरा करणार नाही. हे कायदे म्हणजे, एक मोठा रोग होता, पण आता हा रोग गेला. सरकारने आता आमच्या इतर मागण्यांवरही विचार करावा.

टिकैत पुढे म्हणाले की, एमएसपी हा मोठा प्रश्न आहे, सरकारने यावर बोलले पाहिजे. याशिवाय प्रदूषण ही मोठी समस्या आहे, त्यावरही चर्चा करावी. मागील दहा वर्षांपासून ट्रॅक्टरचा विषय प्रलंबित आहे, त्यावर चर्चा व्हायला हवी. एमएसपीवर चर्चा करुन कायदा करायला हवा. कृषी कायदा विधेयक मागे घेतल्याने आनंद आहेच, पण आता सरकारने लवकर दुसऱ्या विषयावर बोलायला हवं, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments