R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

परमबीर सिंह आणि सचिन वाझे यांचा झाला आमना-सामना ?

 

मुंबई | माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचा आरोप लगावून एकाच खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर सिंह हे फरार सल्याचे जाहीर करण्यात आले होते मात्र काही दिवसापूर्वी परमबीर सिंह हे ठाणे कोर्टात हजार राहिले होते. दरम्यान, चांदीवाल आयोगासमोर जाताना मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह आणि सचिन वाझे आज एकमेकांसमोर आले.

त्यावेळी दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवाद झाला. पण यावेळी दोघांमध्ये काय बोलणे झाले हे काही समजू शकले नाही. तरी, चांदीवाल आयोगासमोर गैरहजर राहिल्याने याआधी दोनदा बजावलेले जामीनपात्र वॉरंट आता रद्द करण्यात आले आहे. चौकशीच्या फेऱ्यात अडकलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह चांदीवाल आयोगासमोर हजर झाले होते.

यावेळी चांदीवाल आयोगाने परमबीर सिंहांना बजावलेले जामीनपात्र वॉरंट रद्द केले आहे. परंतु, आयोगासमोर हजर राहण्यापूर्वी परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले होते. त्यावेळी या दोघांमध्ये काही सेकंदांसाठी संवादही झाला. पण त्यांच्यात नेमकं काय बोलणं झाले ते कळू शकले नाही.

काही दिवसांपूर्वी उद्योजक मुकेश अंबानींच्या मुंबईतील घराबाहेर स्फोटकं आढळली होती. तेव्हापासून राज्याच्या राजकारणात भूकंप झाला. या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे झालेच, पण या प्रकरणाने वेगळे वळणंही घेतले. याचप्रकरणी सचिन वाझेंना अटक करण्यात आली आहे. सचिन वाझेंच्या अटकेनंतर पहिल्यांदाज परमबीर सिंह आणि सचिन वाझे एकमेकांसमोर आले.

Suraj Gaikwad

Author: Suraj Gaikwad

RELATED ARTICLES

मोठी बातमी | विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

  मुंबई | मागच्या अणे दिवसांपासून मागणी होत असलेल्या शक्ती कायद्याला अखेर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी तथा विरोधकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या...

नवाब मलिक यांचे भाजपाला सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे जाहीर आव्हान

  महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार असल्यामुळे भाजपने हिंमत असेल तर सरकारविरोधात अविश्वास ठराव आणावा, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक...

सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेना आमदार भास्कर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments