R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home दुनिया डोंबिवलीतील 'त्या' कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

डोंबिवलीतील ‘त्या’ कोरोना रुग्णाच्या कुटूंबियांचा कोरोना अहवाल आला समोर

डोंबिवली | कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने सध्या संपूर्ण जगभरची चिंता वाढवली आहे. त्यातच दक्षिण आफ्रिकेतून डोंबिवलीत आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याने महाराष्ट्रात या विषाणूचा शिरकाव तर होणार नाही, अशी शंका उपस्थित केली जात होती. संबंधित व्यक्तीने कोरोना लसीचा एकही डोस घेतलेला नाही, तसेच तो केपटाऊनवरून परतला असल्याची माहिती समोर आली आहे.

दरम्यान, आता त्या डोंबिवलीतील व्यक्तीच्या कुटूंबियांची कोरोना चाचणी कऱण्यात आली आहे. त्यानंतर त्यांचा कोरोना अहवाल समोर आला आहे. तसेच कोरोना अहवालामध्ये चाचणी करण्यात आलेल्या सहा जणांपैकी पाच जणांचा कोरोना अहवाल निगेटीव्ह आला आहे. त्यामुळे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या आरोग्य अधिकारी डाॅ. प्रतिभा पानपाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार संबंधित परदेशातून परतलेल्या कोरोना रुग्णाच्या कुटूंबातील सहा जणांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्यापैकी आता ५ जणांचा कोरोना अहवाल प्राप्त झाला आणि तो निगेटिव्ह आहे शिवाय आणखी एकाचा अहवाल लवकरच प्राप्त होईल. संबंधित रूग्णाच्या शरिरात नवा ओमिक्राॅन व्हेरिएंट आहे की नाही याबाबत अद्याप माहिती समोर आलेली नाहीये.

dinesh_barnwal

Author: dinesh_barnwal

RELATED ARTICLES

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments