R.N.I.MAHMAR/2010/33579

Monday, January 24, 2022

R.N.I.MAHMAR/2010/33579

Home ताज्या बातम्या १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

१० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या प्रवाशांबद्दल मंत्री आदित्य ठाकरेंनी दिली महत्वपूर्ण माहिती

 

मुंबई | दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या प्रवाशांनी राज्याचे टेंशन वाढवले असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत, अशी माहिती पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी अशी माहिती दिली आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेच्या मुख्यालयात मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली. यावेळी आदित्य ठाकरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना हे माहिती दिली आहे.

मंत्री ठाकरे म्हणाले की, “दक्षिण आफ्रिकेतून मुंबईत आलेल्या सर्व प्रवाशांचा शोध सुरु असून १० नोव्हेंबरपासून दक्षिण आफ्रिकेतून १ हजारांच्या आसपास प्रवासी मुंबईत आले आहेत. या सर्वांना ट्रेस केलं जात आहे. जे मुंबईत आहेत, त्यांची माहिती घेतली जात आहे. मुंबईच्या पूर्वतयारीचा आढावा घेतलाय, कोविड सेंटरची तयारी करण्यास सांगितलं आहे. १०२ टक्के लसीकरण पहिला डोस पूर्ण, ७२ टक्के दुसरा डोस पूर्ण झाले आहेत. लसिकरणाच्या वेगासाठी दोन डोसमधील अंतर कमी करणं गरजेचं आहे, तशी विनंती केंद्राकडे करण्यात आली आहे

तसेच आदित्य ठाकरेंनी दिलेल्या माहितीनुसार, “दोन-तीन देश आज लॉकडाऊनमध्ये आहेत. पर्यटनासाठी कोणी कुणाला अडवत नाहीय. पण काळजी घेणं गरजेचं आहे. शाळा आपण सुरु करत आहोत. पण काळजी घेणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे विमान प्रवासासाठी तिकिट बुक करताना विमान कंपन्याना हमी द्यावी लागणार आहे. त्याशिवाय, मागील 15 दिवसांच्या प्रवासाची माहिती विमान कंपन्यांनी ई-मेलद्वारे घ्यावी अशी प्रशासनाने सूचना केली आहे.

Sudarshan_bhoir

Author: Sudarshan_bhoir

RELATED ARTICLES

मोठी बातमी | विधानसभेत ‘शक्ती कायदा’ एकमताने मंजूर

  मुंबई | मागच्या अणे दिवसांपासून मागणी होत असलेल्या शक्ती कायद्याला अखेर हिवाळी अधिवेशनात सत्ताधारी तथा विरोधकांनी एकमताने मंजुरी दिली आहे. राज्याच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्या...

नवाब मलिक यांचे भाजपाला सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्याचे जाहीर आव्हान

  महाविकास आघाडी सरकार हे बहुमताचे सरकार असल्यामुळे भाजपने हिंमत असेल तर सरकारविरोधात अविश्वास ठराव आणावा, असे आव्हानच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक...

सभागृहातच अजित पवारांनी भास्कर जाधवांना सुनावलं, ही महाराष्ट्राची संस्कृती नाही’

मुंबई | विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पहायला मिळालं आहे. शिवसेना आमदार भास्कर...

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

या दिवशी होणार विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक, मात्र दुसरीकडे भाजपने दर्शवली नाराजी

  मुंबई | हिवाळी अधिवेशन महाविकास आघाडी सरकार आज गुंडाळणार अशी चर्चा होती. मात्र, हिवाळी अधिवेशनाचा कालावधी २८ डिसेंबरपर्यंतच असणार आहे. विधिमंडळ कामकाज समितीच्या बैठकीत...

मुस्लिमांना उल्लू बनवण्याच काम खा. इम्तियाज जलील करतायेत – नवाब मलिक

  मुंबई | मुस्लीम आरक्षणाच्या मागणीवरुन एमआयएम'ने महाराष्ट्रात तिरंगा रॅलीचं आयोजन केले होते. या रॅलीच्या माध्यमातून औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी महाविकास आघाडी सरकारवर...

हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढवण्याचे विरोधकांची मागणी

  मुंबई | एसटी कर्मचारी संप, पेपरफुटी, विज बिलाचा प्रश्न, ओबीसी आरक्षणाचा मुद्दा यावर चर्चा अजूनही झाली नाही. त्यामुळे या सर्व मुद्यांवर चर्चा होण्यासाठी आम्ही...

पंतप्रधान मोदींनी घेतली आढावा बैठक, सर्व राज्यांना दिला हा महत्वपूर्ण सल्ला

  नवी दिल्ली | जगभरात दहशत असलेल्या कोरोनाचा नवा व्हेरिएंट ओमायक्रोनची रुग्णसंख्या देशात दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी उच्चस्तरीय आढावा...

Recent Comments